विठ्ठल नामे विठ्ठल झाले
विठ्ठल नामे विठ्ठल झाले ।
देह्भान विसरुनी गेले ।।धृ ।।
सर्वकाळ विठ्ठल चित्तीं ।
ब्रम्हानंदे ते डुलती' ।।१।।
विठ्ठल ध्यानी ,मनी जनी ।
विठ्ठल लोचनी ३ चिंतनी ।।२।।
निळा म्हणे भोगी त्यागी ।
विठ्ठल तया जडला अंगी ।
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नामे ।।३।।
इकडे पंढरी पंढरी तिकडे जेजुरी जेजुरी ।
इकडे विटेवरी उभा , तिकडे घोडयावरी उभा ।
इकडे राही रखुमाई ,तिकडे म्हाळसा बाणाई ।
इकडे भीमा चंद्रभागा ,तिकडे गुप्त वाहे गंगा ।
इकडे बुक्याच लेण ,तिकडे भंडारा उधळण ।
इकडे आरत्या ओवाळती , तिकडे लंगर तोडती ।
इकडे गोपाळ खेळती ,तिकडे मुरळ्या नाचती ।
तुका म्हणे सत्य जाणा ,विठू पंढरीचा राणा ।
विठ्ठल नामे विठ्ठल झाले ।
देह्भान विसरुनी गेले ।।धृ ।।
सर्वकाळ विठ्ठल चित्तीं ।
ब्रम्हानंदे ते डुलती' ।।१।।
विठ्ठल ध्यानी ,मनी जनी ।
विठ्ठल लोचनी ३ चिंतनी ।।२।।
निळा म्हणे भोगी त्यागी ।
विठ्ठल तया जडला अंगी ।
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नामे ।।३।।
इकडे पंढरी पंढरी तिकडे जेजुरी जेजुरी ।
इकडे विटेवरी उभा , तिकडे घोडयावरी उभा ।
इकडे राही रखुमाई ,तिकडे म्हाळसा बाणाई ।
इकडे भीमा चंद्रभागा ,तिकडे गुप्त वाहे गंगा ।
इकडे बुक्याच लेण ,तिकडे भंडारा उधळण ।
इकडे आरत्या ओवाळती , तिकडे लंगर तोडती ।
इकडे गोपाळ खेळती ,तिकडे मुरळ्या नाचती ।
तुका म्हणे सत्य जाणा ,विठू पंढरीचा राणा ।
No comments:
Post a Comment