Monday, February 27, 2017

                                            राम कुणाचा 
राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा ।
राम कुणाचा कुणाचा कुणाचा शरण जाईल  त्याचा ।
राम कुणाचा कुणाचा कुणाचा पुत्र  दशरथाचा ।
राम कुणाचा कुणाचा कुणाचा पुत्र  कौसल्याचा ।
राम कुणाचा नाथ कुणाचा  नाथ   जानकीचा ।
राम कुणाचा  बंधू  कुणाचा  बंधू लक्ष्मणाचा ।
राम कुणाचा  बंधू कुणाचा  बंधू  भरत  शत्रूघ्नाचाा।
राम कुणाचा स्वामी कुणाचा स्वामी  हनुमंताचा ।
राम कुणाचा  राजा कुणाचा   राजा अयोध्याचा ।।
राम  कशात कशात  शबरीच्या भक्तीत ।
राम  कशात कशात आहिलेच्या मुक्तीत ।
राम  कशात कशात खारीच्या शक्तीत ।
राम  कशात कशात दासांच्या बोधात ।
राम  कशात कशात तुळशीच्या कवनात ।
राम  कशात कशात भजनाच्या रांगात ।
राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा ।
राम कुणाचा कुणाचा  शरण जाईल  त्याचा ।

 राम कुणाचा कुणाचा  प्रेमे गाईल त्याचा ।।

No comments:

Post a Comment