Saturday, February 25, 2017

खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली .... २

 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली.. २ ।।धृ ।।
खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
संगे सरस्वती घेऊन आले  गणपती गजानन ... २
त्या साखरपूडयाची आज बाई साखर वाटली ... २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली ... ।।१।।
खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
संगे पार्वती घेऊन आले शंकर भगवान .. २
तेहतीस कोटी देवांची तीर्थ गर्दी  दाटली ... २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली ...।।२।।
 खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
सांगे  लक्ष्मी घेऊन आले विष्णू नारायण .. २
या जेजूर गडावर दिवटी दीपमाळ पेटली .. २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली.... ।।३।।
 खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
आन पदरामंदी होऊन आली अंबिका गौळण ... २
 खंडेरायाच्या बाणाई चंदन पुराने भेटली .. २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली ..।।४।।

No comments:

Post a Comment