Thursday, February 23, 2017

कृष्णा सावळा देव सावळा 
कृष्णा सावळा देव सावळा 
कृष्णा सावळा देव सावळा ,हरि सावळा ।
                  बाई बाई ,बाई   ।।धृ ।।
नंदाचा बाळ बाई ,छोटा छोटा ।
हा  नंदाचा बाळ बाई ,छोटा छोटा। .... ३ ।।१।। कृष्णा सावळा
  घगर घेऊनी  पाणियासी जाता ।
हा आडवितो ,आमुच्या वाटा  ।... ३।।२।।      कृष्णा सावळा
दही ,दूध ,घेऊनी  मथूरेसी  जात ।
ह्याच्या नगरी ,कशाचा  नाही तोटा तोटा .... ३ ।।३।।कृष्णा सावळा
 एका जनार्दनीं ,केशवा राजा ।
नामामृत भजनी ,लूटा लूटा ... ३ ।।४।।कृष्णा सावळा
 

 

No comments:

Post a Comment