Thursday, April 13, 2017

तुला लागू दे भजनाचा खूळ ,घे हातात'टाळ ।
दिवस हि जातो रात्र हि जाते पुढे पुढे धावे काळ ।
कामामध्ये हरिणामाविण जातो सारा वेळ
रामनामाचा लागू दे चळ ,घे हातात टाळ  ।।१।।
जन्मापासुन केलीस खटपट सारी पोटासाठी
न कळत तुजला तुजला आयुष्याची उलटून गेली साठी
आता आला वृद्धकाळ ।घे हातात टाळ ।।२।।
कन्या पुत्र

Tuesday, April 11, 2017

दत्त म्हणू या  ग दत्त म्हणू या ।
दत्त चरणी आपण सर्व लीन होऊ या ।।धृ ।।

Sunday, April 9, 2017

डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा।
धावत येशी भक्तांसाठी
ब्रम्हा ,विष्णू ,महेश्वरा
डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा।
गोड मंजीरी घुमतेकानी ,नाम रंगले गुरूच्या ध्यानी
ध्याना मधूनी तुझ्या कृपेचा गजर होतोस दिगंबरा
 डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा।
किती वर्णू मी रूप गुरुचे विधान माझ्या शांती सुखाचे
गुदत्ताच्या गुवारी त्या म्हणा भक्त हो डिगंबरा
डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा।
गाणगापुरी जमले सारे मूर्तिकांत हा दत्त पहारे
काळजातले घेऊन गाणे ,नाम एक रे दिगंबरा
डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा।
झोळी उघडा हृदयाची
 

Friday, April 7, 2017

हे भोळ्या शंकरा
आवड तुला  बेलाची
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ... शंकरा
हे भोळ्या शंकरा ... महादेवा
हे भोळ्या शंकरा ... हे भोळ्या शंकरा
 बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा... २
 आवड तुला  बेलाची .... २
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा
गळ्यामधे रुद्राक्षाच्या माळा ,लाविलेत भस्म कपाळा -२
गळ्यामधे रुद्राक्षाच्या माळा ,लाविलेत भस्म कपाळा -२
 लाविलेत भस्म कपाळा -२
आवड तुला  बेलाची .... २
  बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ... शंकरा
हे भोळ्या शंकरा ... महादेवा
हे भोळ्या शंकरा ... हे भोळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
 हे भोळ्या शंकरा... २
 आवड तुला  बेलाची .... २
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा
त्रिशूल डमरू हाथी ,संगे नाचे पर्वती ... हो -२
त्रिशूल डमरू हाथी ,संगे नाचे पर्वती ... हो -२
आवड तुला  बेलाची .... २
  बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ... शंकरा
हे भोळ्या शंकरा ... महादेवा
हे भोळ्या शंकरा ... हे भोळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
 हे भोळ्या शंकरा... २
 आवड तुला  बेलाची .... २
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा
भोलेनाथा आलो तुझ्या दारी ,कुठे हि दिसे ना पुजारी ... हो .. २
भोलेनाथा आलो तुझ्या दारी ,कुठे हि दिसे ना पुजारी ... हो .. २

आवड तुला  बेलाची .... २
  बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ... शंकरा
हे भोळ्या शंकरा ... महादेवा
हे भोळ्या शंकरा ... हे भोळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
 हे भोळ्या शंकरा... २
 आवड तुला  बेलाची .... २
बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा

Saturday, March 18, 2017

छंद तुझा लागला ,गअंबे मला नाद  तुझा लागला ग ।
रत्नांचा चुडा आई ,रत्नांचा चुडा।
कशाने तडकला ,ग राती बाई झांंजेचा भार पडला ।
हिरवी गार चोळी अंबा हिरवी गर चोळी ।
कशाने ओली झाली ,ग राती बाई पालखीला भुज दिली ।
सरज्याची नथ अंबा ,सरज्याची नथ ।
कशाने ओली झाली ,ग अंबा  राती पेल्याने दुध प्याली ।
बुट्टेदार शालू अंबा ,बुट्टेदार शालू।
कशाने मिळविला ,ग राती बाई परशूला खेळवीला ।
सव्वा खंडी उद ,सव्वा खंडी  कपूर ।
कैलासी धुर गेला ,ग आईने माझ्या आराधी गुरु केला ।

Friday, March 17, 2017

  अश्विनशुद्धपक्षी अंबा बैसली सिहासनीं हो
प्रतिपदेपासूनी  घटकस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र जप करुनी भोवती रक्षक ठेवुनी हो

Wednesday, March 15, 2017

                                              दत्ताचे भजन 
                          दत्त म्हणू  या ग दत्त म्हणू या ग 
                          दत्त चरणी आपण सर्व लीन     होऊ या ।।धृ ।।
                         नारदाने दिली
                                              गजानन महाराज 
                  शेवगाच्या गजाननाशी जोडले आमुचे नाते 
                   गणगण गणात बोते म्हणूया गणगण गणात बोते।।धृ ।।
                      आभाळाचे छप्पर ज्याचे घन दिशात दाही ।
                       
                          
                                    गणपतीचे गाणे 
                 तू देवांचा देव गणपती सर्वाहुनी आगळा 
                 वाहतो दुर्वांकुर

Tuesday, March 14, 2017

गुरु महाराज गुरु जय'जय'परब्रम्ह  सदगुरु ।।धृ ।।
चारी मुक्ती दायक दाता उद्धार कल्पतरू ।।१।।
रूप जयाचे मन बुद्धीपर वाचे अगोचरु ।।२।।
अलक्ष अनाप अरुप अव्यय अक्षय परात्पर ।।३।।
  बद्ध    मुमुक्षू शरणागता वज्रपंजरु ।।४।।
आत्मारामी रामदास गोपाळ करुणा करू ।।५।।

Monday, March 13, 2017

श्री दत्ताचे नाम मुखीया माझ्या रामदिनी 
श्री दत्ताचे नाम मुखीया माझ्या रामदिनी
गेलो दत्तमयी होऊनि ,गेलो दत्तमयी होऊनि।।धृ ।।
किती महिमा गावा ,गावा ,चित आळवी एकच लावा
या नामातील सामथ्यानें गेलो मी मोहूनी
गेलो दत्तमयी होऊनी ,गेलो दत्तमयी होऊनि।।१।।
ब्रम्हा ,विष्णू ,महेशांचे ,रूप त्रिमूर्ती एकच साचे
हुदयी मंदिरी प्रतीस्थापना  झाली मी पाहूनी
गेलो दत्तमयी होऊनि ,गेलो दत्तमयी होऊनि।।२।।                        
चरण दोन  हे  मार्ग दाविती  सहाकले सामर्थ अर्पिती
     ईश कृपेहुन   काय मागणे ,मागावे मागुनी
 गेलो दत्तमयी होऊनि ,गेलो दत्तमयी होऊनि।।3| |
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला |
  पांडूरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला
 पांडूरंग विठ्ठला ।भजनी दंग विठ्ठला ।।
 चंद्रभागेतीरी विठ्ठला । शिवलींगधारी विठ्ठला ।।
 दिनानाथ विठ्ठला । पंढरीनाथ  विठ्ठला।।
 विश्व स्वमी विठ्ठला। अंतरस्वामी विठ्ठला।।
रखुमाईवरा विठ्ठला।भक्त तारणा विठ्ठला।।
तरकारधारी विठ्ठला।कल्पकतारी विठ्ठला।।
निवृत्ती प्रिंय  विठ्ठला ।सोपान प्रिंय विठ्ठला ।।
मुक्ताई प्रिंय  विठ्ठला। नामदेव प्रिंय  विठ्ठला।।
ज्ञानाई प्रिंय  विठ्ठला ।तुकाई प्रिंय  विठ्ठला।।
 नाथार्ड प्रिंय  विठ्ठला ।जनाई प्रिंय  विठ्ठला।।
भावभयहरा विठ्ठला ।हरिहरी  हरा विठ्ठला ।।
भक्तीनिवास विठ्ठला ।प्राणस हरा  विठ्ठला ।।
भक्त नयनी विठ्ठला ।दर्शन आशा  विठ्ठला ।।
ह्रुदय जीव्हाळा  विठ्ठला ।वारकर टाळा  विठ्ठला ।।
विश्वव्यापक विठ्ठला ।करुणाकरा विठ्ठला ।।
ज्ञान सिंधू  विठ्ठला ।दिन बिंदू विठ्ठला ।।
अभंग देवा विठ्ठला ।भारूड देवा विठ्ठला ।।
खेळ खेळीया विठ्ठला ।मोक्ष मिळाया विठ्ठला ।।
कृष्ण स्वरूपा  विठ्ठला ।राम स्वरूपा  विठ्ठला ।।
 विष्णू स्वरूपा विठ्ठला ।विराटरूपा विठ्ठला ।।
 आनंद कंदा विठ्ठला ।ब्रम्हानंद विठ्ठला ।।
परमानंदा विठ्ठला ।अक्षर गंगा विठ्ठला ।।
श्रुतीनाद विठ्ठला ।चिपळ्या नाद विठ्ठला ।।
टाळ नाद विठ्ठला ।मृदंग नाद विठ्ठला ।।
सच्चीदानंद विठ्ठला ।विश्वरूपी विठ्ठला ।।
विश्वजननी विठ्ठला ।विश्वात्मका विठ्ठला ।।
 अनाथनाथा विठ्ठला ।दिनानाथा विठ्ठला ।।
करुणाधारा विठ्ठला ।कृपाळूधारा विठ्ठला ।।
द्वारकाधीश विठ्ठला ।आयोद्यापती विठ्ठला ।।
गोकुळ देवा विठ्ठला ।वृंदावनी तू विठ्ठला ।।
सत्यसाई विठ्ठला ।दिव्यसाई विठ्ठला ।।
मायबाप विठ्ठला ।गुरुनाथा विठ्ठला ।।

Sunday, March 12, 2017

                        शिव भजन
शिव शिव म्हणता म्हणता ,यन शिव होई
अध्देैतांचा अनुभव येई ।।धृ ।।
भजनी श्री ss शिव ,गायन श्री शिव
वचनी  श्री ss शिव ,ध्यानी श्री शिव
अंतराचा शिव ,जाणूनी घेई ।।१।।  
नीलकंठ हर ,गंगाधर
उभाकांत तो ,सकल दुःखहार
स्मरता भवभय विलया जाई ।।२।।
शिव   दीनांचा   ,शिव पतितांचा ।
शिव भक्तांचा ,शिव सकलांचा ।
नाम शिवाचे ,शिवापदी नेई ।।३।।
अध्देैतांचा अनुभव येई
शिव शिव म्हणता म्हणता ,यन शिव होई
राधे कृष्णा ,राधे कृष्ण ,कृष्णा कृष्णा राधे राधे  
राधे कृष्णा ,राधे कृष्ण ,कृष्णा कृष्णा राधे राधे
हरे कृष्णा ,हरे कृष्णा ,कृष्णा  कृष्णा हरे हरे 
हरे कृष्णा ,हरे कृष्णा ,कृष्णा  कृष्णा हरे हरे 
  हरे रामा ,हरे रामा  ,    रामा रामा हरे हरे 
  हरे रामा ,हरे रामा  ,    रामा रामा हरे हरे  
   गोवींद बोलो  हरी गोपाल बोलो 
  गोवींद बोलो  हरी गोपाल बोलो 
   राधा रमण हरी गोपाल  बोलो 
   राधा रमण हरी गोपाल  बोलो  
 गोवींद बोलो  हरी श्रीकृष्णा  बोलो 
 गोवींद बोलो  हरी श्रीकृष्णा  बोलो 
राधा रमण हरी श्रीकृष्णा  बोलो
राधा रमण हरी श्रीकृष्णा  बोलो
                    जय जय राम कृष्णं हरी

Saturday, March 11, 2017

इथे का उभा श्रीरामा 
इथे का उभा श्रीराम
मनमोहन मेघश्यामा ।।धृ ।।
काय केली आयोध्यापुरी ।
इथे वसविली  पंढरी ।।१।।
काय केली ,सीतामाई ।
इथे राई ,रखुमाबाई ।।२।।
काय केली शरयू गंगा ।
इथे आणली चंद्रभागा ।।३।।
काय केले वानरदळ ।
जमविले गोपाळ ।।४।।
काय केले धनुष्यबाण ।
कारकटावरी ठेवून ।।५।।
काय केले हनुमंत ।
इथे उभा पुंडलीक भक्त ।।६।।
रामी राम दासभाव ।
तैसा झाला पंढरीराव ।।७।।
मनमोहन मेघश्यामा
इथे का उभा श्रीराम
वर्णावी ती थोरी एका सदगुरुंची 
 वर्णावी ती थोरी सदगुरुंची 
येरा मानवाची कामा नये 
वर्णावी ती थोरी एक सदगुरुंची ।।धृ ।।
सदगुरू समथ कृपेचा सागर 
मनी वारंवार आठवावा 
वर्णावी ती थोरी एका सदगुरुंची ।।१।।              
सदगुरू चरणी तल्लीन हो वृत्ती 
वृत्तीची निवृत्ती  क्षणमागे
 वर्णावी ती थोरी एका सदगुरुंची।।२।।
एक जनार्दनीं आढवी सदगुरू 
भाव सिंधु पारू पावलास 
वर्णावी ती थोरी एका सदगुरुंची।।३।।

Friday, March 10, 2017

 यमुनेच्या तीरी काल  पहिला हरी
यमुनेच्या तीरी काल  पहिला हरी ।ओ ओ ओ 
कान्हा वाजवी बासरी ।।धृ ।।
 बारा सोळा ss गौळ्याच्या  नरी ।
त्या नटूनी  चालल्या मथूरा बाजरी।
त्याने  मारला  खडा न माझा फोडला घडा ।
त्याने फोडिल्या घागरी ।।१।।ओ ओ ओ 
यशोदा बोले बाळ श्रीहरी ।
छडू नको रे गोकूळ नागरी ।
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी ।ओ ओ ओ 
राधा झाली ग बावरी ।
कान्हा वाजवी बासरी।।२।।
एका जनार्दनीं गवळण राधा 
ती विनवी तुजला अरे मुकुंदा 
गवळ्याची  नार करी सोळा शुंगर ।ओ ओ ओ 
लिन झाली चरणावरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।३।।


 

Thursday, March 9, 2017

                    तुळशी पत्र
हरिला आवडते ।प्रभूला आवडते तुळशीचे पान ।
                  हरिला आवडते तुळशीचे पान ।।धृ ।।
तप साधना काही नाही लागत |
आणिक  प्राणायाम । हरिला आवडते तुळशीचे पान ।।१।।
कांसे पितांबर भरजरी शेला।
 मुकुटावरी तुरा छान । हरिला आवडते तुळशीचे पान ।।२।।
माणिक प्रभू म्हणे प्रितीची राधा ।
बुक्का उधळूं छान । हरिला आवडते तुळशीचे पान ।।३।।

                      

Wednesday, March 8, 2017

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपादवल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
क्षागुरूंचे नाम स्मरा हो ।  क्षागुरूंचे भजन करा।

हे नामामृत भवभयहारक। अघसंहारक त्रिभुवनतारक









Tuesday, March 7, 2017

Friday, March 3, 2017

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

सिंदुरचर्चित धवळे अंग, चंदनउटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया

गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्‍ने नेसी विलया

Thursday, March 2, 2017

रामनामाची गोडी लावली हो 
पायी  ह्ळू हळू  चला ,मुखाने गुरुनाम बोल।
रामनामाची गोडी लावली हो ,
किती दयाळू गुरु माझी माऊली
भवनदी हा संसार ,काम क्रोध  जलचर
शांती सुखाची भूल मला पडली हो ,
किती दयाळू गुरु माझी माऊली 
 रामनामाची गोडी लावली हो ।।
या देहाची  सोडीली माया ,हाका मारितो सदगुरुराया ,
मोक्ष पादाचीवाट मला दाविली हो
किती दयाळू गुरु माझी माऊली
 रामनामाची गोडी लावली हो।।
 मनासारीखा दिला मळा वर ,माझ्या मस्तकी ठेविला कर ,
एका क्षणात वाट मला दाविले हो ,
 किती दयाळू गुरु माझी माऊली
रामनामाची गोडी लावली हो।।
आल्या जन्माचे सार्थक केले ,मला संतांचे  दरबारी नेले ,
त्यांनीं मला संतची बनविले हो ,
 किती दयाळू गुरु माझी माऊली 
 रामनामाची गोडी लावली हो ।।

Tuesday, February 28, 2017

 सदगुरु  सारिखा असता पाठीराखा 
 सदगुरु  सारिखा असता पाठीराखा ... २
इतरांचा लेख कोण करी ,कोण करी ....२ ।।धृ ।।
राजयांची  कांता  काय  भीक मागे ... २
मनाचिया योगे सिद्धी पावे ,सिद्धी पावे... ३।।१।।
कल्पलतरु  तळवरी जो बैसला ... २
काय उणे त्याला सांगा जोजी ,सांगा जोजी ... २
 काय उणे त्याला सांगा जोजी।।२।।
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ... २
आता उधरलो गुरु कृपे ... ३।।३।।
सदगुरु  सारिखा असता पाठीराखा 
इतरांचा लेख कोण करी ,कोण करी ....२

Monday, February 27, 2017

विठ्ठल नामे  विठ्ठल झाले
विठ्ठल नामे  विठ्ठल झाले ।
देह्भान  विसरुनी  गेले  ।।धृ ।।
सर्वकाळ विठ्ठल चित्तीं ।
ब्रम्हानंदे  ते डुलती'  ।।१।।
विठ्ठल ध्यानी ,मनी जनी ।
विठ्ठल लोचनी ३ चिंतनी ।।२।।
निळा म्हणे  भोगी  त्यागी ।
विठ्ठल तया जडला अंगी ।
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल  नामे ।।३।।
 इकडे पंढरी पंढरी तिकडे जेजुरी जेजुरी ।
इकडे विटेवरी उभा , तिकडे घोडयावरी  उभा ।
इकडे राही रखुमाई ,तिकडे म्हाळसा बाणाई ।
इकडे भीमा चंद्रभागा ,तिकडे गुप्त वाहे गंगा ।
इकडे बुक्याच लेण ,तिकडे भंडारा उधळण ।
इकडे आरत्या ओवाळती , तिकडे लंगर  तोडती ।
इकडे गोपाळ खेळती ,तिकडे मुरळ्या नाचती ।
तुका म्हणे सत्य जाणा ,विठू पंढरीचा राणा ।
एक मागणे मागाया 

एक मागणे मागाया ।
 आले दारी मी  तुझीया ।
श्री दत्ता तू दे मजला ।।धृ ।।
नाम तुझे स्मरण्य़ाला।
शांती देई चित्ताला ।।१।।
नाम तुझे सांगाया ।
गोड वाणी दे मजला ।।२।।
रूप तुझे बघण्याला ।
दिव्य द्रूष्टी दे मजला।।३।।
गुण तुझे ऐकण्याला ।
कान देई श्रावणाला ।।४।।
मंदिरीं तुझ्या येण्याला ।
शक्ती देई पाऊला ।।५।।
दीन ही दुबळा कोणी दिसताना ।
उध्दार कर दे  करण्याला ।।६।। 
पार्थव तसे चरणाला ।
चरण शारदा ही तुजला ।।७।।
श्री दत्ता तू दे मजला।
स्वामी समर्था द्या मजला ।
                                            राम कुणाचा 
राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा ।
राम कुणाचा कुणाचा कुणाचा शरण जाईल  त्याचा ।
राम कुणाचा कुणाचा कुणाचा पुत्र  दशरथाचा ।
राम कुणाचा कुणाचा कुणाचा पुत्र  कौसल्याचा ।
राम कुणाचा नाथ कुणाचा  नाथ   जानकीचा ।
राम कुणाचा  बंधू  कुणाचा  बंधू लक्ष्मणाचा ।
राम कुणाचा  बंधू कुणाचा  बंधू  भरत  शत्रूघ्नाचाा।
राम कुणाचा स्वामी कुणाचा स्वामी  हनुमंताचा ।
राम कुणाचा  राजा कुणाचा   राजा अयोध्याचा ।।
राम  कशात कशात  शबरीच्या भक्तीत ।
राम  कशात कशात आहिलेच्या मुक्तीत ।
राम  कशात कशात खारीच्या शक्तीत ।
राम  कशात कशात दासांच्या बोधात ।
राम  कशात कशात तुळशीच्या कवनात ।
राम  कशात कशात भजनाच्या रांगात ।
राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा ।
राम कुणाचा कुणाचा  शरण जाईल  त्याचा ।

 राम कुणाचा कुणाचा  प्रेमे गाईल त्याचा ।।

Saturday, February 25, 2017

खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली .... २

 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली.. २ ।।धृ ।।
खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
संगे सरस्वती घेऊन आले  गणपती गजानन ... २
त्या साखरपूडयाची आज बाई साखर वाटली ... २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली ... ।।१।।
खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
संगे पार्वती घेऊन आले शंकर भगवान .. २
तेहतीस कोटी देवांची तीर्थ गर्दी  दाटली ... २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली ...।।२।।
 खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
सांगे  लक्ष्मी घेऊन आले विष्णू नारायण .. २
या जेजूर गडावर दिवटी दीपमाळ पेटली .. २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली.... ।।३।।
 खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
आन पदरामंदी होऊन आली अंबिका गौळण ... २
 खंडेरायाच्या बाणाई चंदन पुराने भेटली .. २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली ..।।४।।

Friday, February 24, 2017

मखर सजविले 


मखर सजविले तुझ्याचीसाठी दुर्वांची आरास ।
गुलाल उधळा आज आले पहा घरी गणराज ।।धृ  ।।
  चला प्रार्थूया गणरायाला 
वंदन करूया श्री चरणाला 
 तूझ्या रुपाने घरात 
माझ्या सौख्याची  बरसात  ।।१।।
 तेज दिव्याचे  शांत  ठेवते 
तूझ्या  मुखावर प्रभा उजळते 
प्रमेश्वर तू  ज्ञानाचा रे                              
प्रगरे जणू रविराज ।।२।।
वक्रतुंड तू विघ् विनाशक 
जन्मोजन्मी तूझीच सेवक 
पहात होतो वाट तूझी रे 
मूर्ती ठसे ह्रुदयात ।।३।।
मोदक केले नैवेद्याला
अर्पियले मी प्रभू चरणाला 
प्रसन्न  होऊन भक्तावरती 
कृपा दिसो नयनात ।।४।।