Tuesday, February 28, 2017

 सदगुरु  सारिखा असता पाठीराखा 
 सदगुरु  सारिखा असता पाठीराखा ... २
इतरांचा लेख कोण करी ,कोण करी ....२ ।।धृ ।।
राजयांची  कांता  काय  भीक मागे ... २
मनाचिया योगे सिद्धी पावे ,सिद्धी पावे... ३।।१।।
कल्पलतरु  तळवरी जो बैसला ... २
काय उणे त्याला सांगा जोजी ,सांगा जोजी ... २
 काय उणे त्याला सांगा जोजी।।२।।
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ... २
आता उधरलो गुरु कृपे ... ३।।३।।
सदगुरु  सारिखा असता पाठीराखा 
इतरांचा लेख कोण करी ,कोण करी ....२

Monday, February 27, 2017

विठ्ठल नामे  विठ्ठल झाले
विठ्ठल नामे  विठ्ठल झाले ।
देह्भान  विसरुनी  गेले  ।।धृ ।।
सर्वकाळ विठ्ठल चित्तीं ।
ब्रम्हानंदे  ते डुलती'  ।।१।।
विठ्ठल ध्यानी ,मनी जनी ।
विठ्ठल लोचनी ३ चिंतनी ।।२।।
निळा म्हणे  भोगी  त्यागी ।
विठ्ठल तया जडला अंगी ।
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल  नामे ।।३।।
 इकडे पंढरी पंढरी तिकडे जेजुरी जेजुरी ।
इकडे विटेवरी उभा , तिकडे घोडयावरी  उभा ।
इकडे राही रखुमाई ,तिकडे म्हाळसा बाणाई ।
इकडे भीमा चंद्रभागा ,तिकडे गुप्त वाहे गंगा ।
इकडे बुक्याच लेण ,तिकडे भंडारा उधळण ।
इकडे आरत्या ओवाळती , तिकडे लंगर  तोडती ।
इकडे गोपाळ खेळती ,तिकडे मुरळ्या नाचती ।
तुका म्हणे सत्य जाणा ,विठू पंढरीचा राणा ।
एक मागणे मागाया 

एक मागणे मागाया ।
 आले दारी मी  तुझीया ।
श्री दत्ता तू दे मजला ।।धृ ।।
नाम तुझे स्मरण्य़ाला।
शांती देई चित्ताला ।।१।।
नाम तुझे सांगाया ।
गोड वाणी दे मजला ।।२।।
रूप तुझे बघण्याला ।
दिव्य द्रूष्टी दे मजला।।३।।
गुण तुझे ऐकण्याला ।
कान देई श्रावणाला ।।४।।
मंदिरीं तुझ्या येण्याला ।
शक्ती देई पाऊला ।।५।।
दीन ही दुबळा कोणी दिसताना ।
उध्दार कर दे  करण्याला ।।६।। 
पार्थव तसे चरणाला ।
चरण शारदा ही तुजला ।।७।।
श्री दत्ता तू दे मजला।
स्वामी समर्था द्या मजला ।
                                            राम कुणाचा 
राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा ।
राम कुणाचा कुणाचा कुणाचा शरण जाईल  त्याचा ।
राम कुणाचा कुणाचा कुणाचा पुत्र  दशरथाचा ।
राम कुणाचा कुणाचा कुणाचा पुत्र  कौसल्याचा ।
राम कुणाचा नाथ कुणाचा  नाथ   जानकीचा ।
राम कुणाचा  बंधू  कुणाचा  बंधू लक्ष्मणाचा ।
राम कुणाचा  बंधू कुणाचा  बंधू  भरत  शत्रूघ्नाचाा।
राम कुणाचा स्वामी कुणाचा स्वामी  हनुमंताचा ।
राम कुणाचा  राजा कुणाचा   राजा अयोध्याचा ।।
राम  कशात कशात  शबरीच्या भक्तीत ।
राम  कशात कशात आहिलेच्या मुक्तीत ।
राम  कशात कशात खारीच्या शक्तीत ।
राम  कशात कशात दासांच्या बोधात ।
राम  कशात कशात तुळशीच्या कवनात ।
राम  कशात कशात भजनाच्या रांगात ।
राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा ।
राम कुणाचा कुणाचा  शरण जाईल  त्याचा ।

 राम कुणाचा कुणाचा  प्रेमे गाईल त्याचा ।।

Saturday, February 25, 2017

खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली .... २

 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली.. २ ।।धृ ।।
खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
संगे सरस्वती घेऊन आले  गणपती गजानन ... २
त्या साखरपूडयाची आज बाई साखर वाटली ... २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली ... ।।१।।
खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
संगे पार्वती घेऊन आले शंकर भगवान .. २
तेहतीस कोटी देवांची तीर्थ गर्दी  दाटली ... २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली ...।।२।।
 खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
सांगे  लक्ष्मी घेऊन आले विष्णू नारायण .. २
या जेजूर गडावर दिवटी दीपमाळ पेटली .. २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली.... ।।३।।
 खंडेरायाच्या लग्नाला गं आलं   व्हराडी कोन कोन .. २
आन पदरामंदी होऊन आली अंबिका गौळण ... २
 खंडेरायाच्या बाणाई चंदन पुराने भेटली .. २
 नवरी नटली , काबुबाई  सुपारी फुटली ..।।४।।

Friday, February 24, 2017

मखर सजविले 


मखर सजविले तुझ्याचीसाठी दुर्वांची आरास ।
गुलाल उधळा आज आले पहा घरी गणराज ।।धृ  ।।
  चला प्रार्थूया गणरायाला 
वंदन करूया श्री चरणाला 
 तूझ्या रुपाने घरात 
माझ्या सौख्याची  बरसात  ।।१।।
 तेज दिव्याचे  शांत  ठेवते 
तूझ्या  मुखावर प्रभा उजळते 
प्रमेश्वर तू  ज्ञानाचा रे                              
प्रगरे जणू रविराज ।।२।।
वक्रतुंड तू विघ् विनाशक 
जन्मोजन्मी तूझीच सेवक 
पहात होतो वाट तूझी रे 
मूर्ती ठसे ह्रुदयात ।।३।।
मोदक केले नैवेद्याला
अर्पियले मी प्रभू चरणाला 
प्रसन्न  होऊन भक्तावरती 
कृपा दिसो नयनात ।।४।।
हे गौरी नंदना  आवड तुला जास्वदींची
 जास्वदींच्या  फ़ुलाची ।।धृ ।।
वक्रतुंड  तु  गजानना ।
पार्वतीचा बाळ भालचंद्रा ...  हो ss  ।।१।।आवड तुला
सर्वांगी उटी शेंदुराची ।
कांठीमाळ   मुक्ताफळांची  ... ।।२।।आवड तुला
 विघ्नहता विनायका ।
सिद्धीचा तु सिद्धटेक ... ।।३।।आवड तुला
गजमुखा तु गजेंद्र ।
ओंकार तु भालचंद्रा ... ।।४।।आवड तुला
ओंकाराचा छंद 
ओंकाराचा छंद मला लागला ।
आनंदी आनंदsss  मनी sss जाहला ss ।
ॐ गणपतये  नमः (४)  ।।धृ ।।
प्राणवाचे  रूपी  चिन्मय  मी झाले ।
नाम स्मरणात रंगून मी  गेले ।
         सांगे आत्मा  जणू रंगला  ।।१।।
श्री गजानन  जय गजानन ...(४)
ध्यान गणेशाचे साकारले
पाझरुनी  आला भक्तीचा

Thursday, February 23, 2017

                           लागला गुरु भजनाचा छंद 

लागला गुरु भजनाचा छंद  -३
हाची रे  हृदयाचा आनंद ... २
लागला गुरु भजनाचा छंद  ।। धृ ।।
गुरुस्वरूपी धुंद  व्हावे , चींतनी  त्याच्या  जग  विसरावे 
भजनी नर्तनो हरपून जाता ... २
मिळतो ब्रमानंद ।।१।।
गुरु मोहिमेची गोडी न्यारी ,झडतील पापे विघ्नेे सारी ,
गुरु रायाच्या गुरु स्मरणानेेss ... २
फुलतो  प्रेम सुगंध .. ।।२।।
गुरुरायाची प्रित निराळी काही न घेता सारे उदळी 
गुरुसेवेची रीत कळेना ... २
दास हा मतीमंद ।।३।।
 लागला गुरु भजनाचा छंद.. २
 हाची रे  हृदयाचा आनंद ... २
लागला गुरु भजनाचा छंद  -३
उधळा अबीर ,उधळा गुलाल 
गणपती बाप्पा  मोरया ,मंगलमूर्ती  मोरया ।२
उधळा अबीर ,उधळा गुलाल, रंग उधळा  रे ।२
 नाचू सारे आनंदाने ,गणपती आले  रे sss ।१
 बाप्पा मोरया ss बाप्पा मोरया ।
 बाप्पा मोरया बाप्पा मोरया हो  बाप्पा मोरया बाप्पा मोरया ।।धृ ।।
मंजुळ गाणी ss नित्य  रमू या ss  .. २
शहनाईचे ss  सूर ,घूमू  द्या   SS ... २ 
ढोल वाजवा आणि तुतारी ,गगनी भिडवा रे  ।।१।।
पायी घुगंरु ss  ,बांधून नाचा ss  ...२
घोष करा हो ,विघ्नहराचाss  ... २
गणपती बाप्पा मोरया ,मंगल मूर्ती मोरया ।
 पायी घुगंरु ss  ,बांधून नाचा ss  ...१
 घोष करा हो ,विघ्नहराचाSS ...१
चला पालखी वाहू ,स्वर्गीचे  संचित आले रे ।।२।।
गणरायाच्या ss   आगमनाने ss  ... २
 जग आनंदी ss होईल सारे  ss ... २
दही दिशातून ,चंदन गंधीत ,सुगंध भरला रे ss  ।।३।।
उधळा अबीर ,उधळा गुलाल, रंग उधळा  रे
बाप्पा मोरया ss बाप्पा मोरया 
कृष्णा सावळा देव सावळा 
कृष्णा सावळा देव सावळा 
कृष्णा सावळा देव सावळा ,हरि सावळा ।
                  बाई बाई ,बाई   ।।धृ ।।
नंदाचा बाळ बाई ,छोटा छोटा ।
हा  नंदाचा बाळ बाई ,छोटा छोटा। .... ३ ।।१।। कृष्णा सावळा
  घगर घेऊनी  पाणियासी जाता ।
हा आडवितो ,आमुच्या वाटा  ।... ३।।२।।      कृष्णा सावळा
दही ,दूध ,घेऊनी  मथूरेसी  जात ।
ह्याच्या नगरी ,कशाचा  नाही तोटा तोटा .... ३ ।।३।।कृष्णा सावळा
 एका जनार्दनीं ,केशवा राजा ।
नामामृत भजनी ,लूटा लूटा ... ३ ।।४।।कृष्णा सावळा